समुद्रवाणीच्या ठावडी बाजारात चाेरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:47+5:302021-03-06T04:30:47+5:30

समुद्रवाणी : उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील आठवडी बाजारात मोबाइलच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाेलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, ...

There is a lot of food in the market of Samudravani | समुद्रवाणीच्या ठावडी बाजारात चाेरांचा वावर

समुद्रवाणीच्या ठावडी बाजारात चाेरांचा वावर

समुद्रवाणी : उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील आठवडी बाजारात मोबाइलच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाेलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

चिखली येथील पोलीस पाटील प्रमोद हरिभाऊ महामुनी यांच्या मोबाइलच्या चोरीची नोंद बेंबळी पोलिसांत झाली आहे.

यापूर्वी ही दोन वेळेस आठवडी बाजारात मोबाइल चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, परंतु एकाच वेळी गुन्हा दाखल होऊ शकला. चोरटा अल्पवयीन असल्याचे कारण देत, त्यास सोडून देण्यात आले. दोन्हीही वेळेस तेलगू भाषिक लहान मुलेच सापडली. यांच्यासाेबत एक महिलांची टोळी सक्रिय असल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, चाेरीच्या घटना वाढल्या असतानाही पाेलीस अथवा ग्रामपंचायतीकडून ठाेस उपाययाेजना करण्यात आलेल्या नाहीत.

Web Title: There is a lot of food in the market of Samudravani