शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यात ८५ गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:34 IST

पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़

ठळक मुद्दे ७७ गावांना कुपनलिकांद्वारेप पाणीपुरवठाआठ गावांना टँकरचा आधार

उस्मानाबाद : दिवसेंदिवस दुष्काळी झळा तीव्र होत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ जिल्ह्यातील ८५ गावांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत़ यातील ८ गावांना टँकरद्वारे तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

यंदा वेळेवर पडलेला पाऊस नंतर गायब झाला़ मध्यंतरीच्या कालावधीत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ परतीचा पाऊस पडलाच नाही़ परिणामी जिल्ह्यातील २२३ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही़ सद्यस्थितीत ५० हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, शंभरावर प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ साधारणत: ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे़ परिणामी गावा-गावाला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़

विशेषत: गावा-गावातील हातपंप, कुपनलिकाही उचक्या मारू लागल्या आहेत़ घागरभर पाण्यासाठी महिला, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ जिल्ह्यातील शेकडो गावे टंचाईने त्रस्त झाली आहेत़ तालुकास्तरावरील प्रशासनाकडे शेकडो अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव धडकले आहेत़ निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १३१ कुपनलिकांचे अधिग्रहण केले आहे़ यात आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी आठ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

यात उस्मानाबाद तालुक्यातील चार गावात टँकर सुरू असून, ३९ गावांसाठी ७३ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तुळजापूर तालुक्यातील चार गावांसाठी चार अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ लोहारा तालुक्यातील दोन गावांची तहान भागविण्यासाठी दोन अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

कळंब तालुक्यातील १८ गावांसाठी १८ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर तर दोन गावांसाठी कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ वाशी तालुक्यातील एका गावासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर परंडा तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

उस्मानाबादला अधिक झळा.... सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा उस्मानाबाद तालुक्याला बसत आहेत़ उस्मानाबाद तालुक्यासाठी एकूण ७७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात चार गावांसाठी टँकर सुरू असून, टँकरसाठी चार अधिग्रहणे आहेत़ तर ३९ गावांसाठी ७३ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

या गावांना टँकरचा आधार.... उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, भूम तालुक्यातील वालवड व गिरवली गावांना तर परांडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी या जिल्ह्यातील आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईOsmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळ