शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:26 IST

महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला.

कळंब (जि.उस्मानाबाद) : कसायला घेतलेल्या फडात सालभर जोपासलेले ''कष्ट'' कोयता लागत नसल्याने तसेच निपचीत पडलेले होते. यातच पंधरा महिने झालेल्या या उसावर महावितरणच्या शॉर्टसर्किटचा ''कोप'' झाला. या वणव्यात कुटुंबाचा आधार असलेली ६५ वर्षीय महिला शेतकरी खचली अन् सोमवारी तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सौंदणा येथे घडली आहे.

मांजरा तीरावरील सौंदणा गावात प्रकल्प भरला की शिवार अन् मन खुललेले आणि फुललेले असते. गाळप हंगाम सुरू झाला की उसाच्या गोडव्याचा दरवळ प्रफुल्लित करतो. यंदा मात्र शेतकरी अतिरिक्त उसाच्या संकटाने हतबल झाले आहेत. सौंदण्याच्या पाचपिंडे कुटुंबाची काही वेगळी अवस्था नव्हती. बालाजी, विनायक अन् दत्ता हे तिघे भाऊ. जमीन जेमतेम दोन एकर. यात भागत नसल्याने शेजारच्या चुलत्यांची जमीन कसायला घेत ऊस लावला अन् सालभर कष्ट उपसत पिकवला. मात्र, तोड मिळत नसल्याने त्यांची मागच्या तीन महिन्यांपासून फरपट सुरू होती. हे कमी म्हणून की काय महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हताश झाले. यात या पाचपिंडे बांधावांची शेतकरी आई अंजनाबाई याही अस्वस्थ झाल्या. रविवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लागलीच अंबाजोगाईच्या रुग्णालयात हलवले. मात्र, हृदयविकाराचा धक्का तीव्र स्वरूपाचा असल्याने सोमवारी सकाळी अंजनाबाई पाचपिंडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

कारखाने ढुंकूनही पाहेनात...७ एप्रिल रोजी दत्ता पाचपिंडे यांचा ऊस जळाला. यानंतर तीन दिवसांनी या धक्क्यातून न सावरलेल्या त्यांच्या आई अंजनाबाई यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असले तरी तीन दिवसांपासून फडात जळून निपचीत पडलेला ऊस घेण्यास कोण्या कारखान्यांची यंत्रणा आलेली नव्हती. यावर खेद व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीSugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद