शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्टेअरिंग जॅम झाले अन् बस पुलाच्या कठड्यावर चढली; प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:10 IST

अनर्थ टळला : वाहक, चालकासह प्रवासी बालंबाल बचावले

तेर : तीव्र वळण रस्त्यावर अचानक स्टेअरिंग जॅम झाल्याने प्रवासी घेऊन जाणारी बस तेरणा नदीपात्रावरील पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने बस नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली. नशीब बलवत्तर म्हणून वाहक, चालकासह आतील पाच ते सहा प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील तेरनजीक घडली.

कळंब आगाराची साेलापूर-कळंब ही बस (एमएच.१४-बीटी.१६३९) बुधवारी रात्री तेर येथे मुक्कामी हाेती. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बस धाराशिव मार्गे साेलापूर येथे गेली हाेती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही बस पुन्हा साेलापूरहून तेर येथे पाेहाेचली. येथे प्रवासी साेडल्यानंतर ही बस कळंबच्या दिशेने रवाना झाली. ही बस तेर गावानजीक असलेल्या धरणाजवळ तेरणा नदीच्या पात्रावरील पुलावर आली असता, अचानक स्टेअरिंग जॅम झाले. परिणामी, ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखले व पाठीमागील चाक कठड्यात अडकल्यामुळे बस नदीपात्रामध्ये काेसळता-काेसळता वाचली. या बसमधून वाहक, चालक व पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत हाेते. यांचे नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचेच प्रमाण वाचले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसची अवस्था पाहून उपस्थितांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महामंडळाने किमान बसेसची अवस्था तरी सुधारावी, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली.

तुळजापुरातच बस झाली खराब...साेलापूरहून येत असतानाच तुळजापूर येथे साेलापूर-कळंब ही बस खराब झाली हाेती. त्यामुळे तुळजापूर आगारात बस बदली करण्यात आली. ही बस कशीबशी तेर येथे पाेहाेचली. मात्र, धरणानजीक असलेल्या तेरणा नदीवरील पुलावर आल्यानंतर बसचे स्टेअरिंग अचानक जॅम झाले. त्यामुळे ही बस थेट पुलाच्या कठड्यावर चढली. पाठीमागील चाक कठड्याला अडकल्याने माेठा अनर्थ टळला.

बसमध्ये हाेते पाच प्रवासी...साेलापूर-कळंब या बसने तेर येथे काही प्रवासी साेडले. यानंतर ही बस जवळपास पाचजणांना घेऊन कळंबच्या दिशेने निघाली हाेती. वाहक, चालकासह सातजण आत हाेते. हीच बस तेरणा नदीपात्रात काेसळता-काेसळता वाचली.

बसची अवस्थाही बिकटच...तुळजापूर येथे बदली करून घेतलेल्या बसची अवस्थाही फार काही चांगली नव्हती. खिडक्यांच्या काचा खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी पत्रा उचकटलेला आहे. याच बसचे स्टेअरिंग जॅम झाल्याने दुर्घटना घडली.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची नाही का?एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलतीच्या येाजना आणल्या आहेत. मात्र, दुसरीकडे बहुतांशी बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जीव मुठीत धरून लाेकांना प्रवास करावा लागत आहे. अनेक बसेस वापराबाहेर गेल्या आहेत. तरीही दामटल्या जात आहेत. परिणामी, अपघाती घटनांमध्ये माेठी वाढ झाली आहे. असे असतानाही महामंडळाकडून मात्र उपाययाेजना हाेताना दिसत नाहीत. महामंडळाला लाेकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही का, असा सवाल प्रवासी सहदेव कावळे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Accidentअपघातdharashivधाराशिवstate transportएसटी