शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवमधील महिलेच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक; संतोष देशमुख खुनाचेही धागेदोरे हाती लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:22 IST

या महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता.

Dharashiv Murder Crime : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील आडसच्या मनीषा बिडवे या महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सदर महिलेच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले या मुख्य आरोपीसह  उस्मान गुलाब सय्यद याला अटक केली आहे. या खून प्रकरणाचा केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीही संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आरोपींच्या अटकेने नवी माहिती उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मनीषा बिडवे या महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता. या महिलेचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अंजली दमानिया यांनी सोमवारी केला. मात्र, स्थानिक कळंब पोलिसांनी, अशी काही माहिती नसल्याचं काल स्पष्ट केलं आहे.

बीड जिल्ह्यातील आडस येथील मनीषा बिडवे ही महिला काही महिन्यांपासून कळंब शहरात एकटीच वास्तव्यास होती. मागच्या आठवडाभरात या घरातून कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी दार उघडून पाहिले असता मनीषा बिडवे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. महिलेच्या डोक्याला जखमा होत्या व जवळच हातोडा पडलेलाही दिसून आला. यावरून खुनाची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी रात्री या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या घटनेतील मृत महिलेचा वापर करून सरपंच संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण