शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कुणबी दाखल्याचा आधार, आथर्डीत ठरल्या पहिल्या सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:46 IST

सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित

कळंब (जि. धाराशिव) : धाराशिव जिल्ह्यातील आथर्डी येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाच्या रिक्त जागी कुसुम चौधरी यांची निवड जाहीर झाली आहे. त्यांनी अलिकडेच निर्गमित झालेले ''कुणबी'' प्रमाणपत्र उमेदवारी अर्जास संलग्न केले होते. या माध्यमातून मराठा आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रावर सरपंच झालेल्या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच ठरल्या.

आथर्डी (ता. कळंब) येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने तद्नंतर झालेल्या सरपंच निवडीत रतन अशोक सुब्रे यांची निवड झाली होती. सरपंच रतन सुब्रे यांनी मागच्या काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जागा रिक्त झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी २ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा तहसील कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कुसुम काकासाहेब चौधरी यांनी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर झाली. अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी प्रणिता दराडे यांनी काम पाहिले.

नव्यानेच मिळाले होते प्रमाणपत्रसरपंच बनलेल्या कुसुम चौधरी यांना नुकतेच ''कुणबी'' प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते. त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करताना हेच कुणबी प्रमाणपत्र व याच्या पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती सादर केली होती. यावरून चौधरी यांची नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला सरपंचपदी निवड झाली आहे.

जरांगे-पाटील यांची घेतली भेटनूतन सरपंच कुसुम चौधरी, अतुल गायकवाड, चेतन कात्रे, दत्ता तनपुरे, ॲड. अशोक चोंदे, शंकरचंद्र खंडागळे, पंडित देशमुख, नितीन चौधरी यांनी निवड जाहीर झाल्यानंतर जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची फलश्रुती कथन केली व आभारही मानले.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबाद