दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा, मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:22+5:302021-04-21T04:32:22+5:30

चाैकट... हे साहित्य कस्टडीत... जिल्ह्यात अद्याप दहावी अथवा बारावीच्या मुख्य पेपरसाठीच्या काेऱ्या उत्तरपत्रिका आलेल्या नाहीत. प्रॅक्टिकल परीक्षेच्या मार्कशीट मिळाल्या ...

Tenth-twelfth grade answer sheets hit schools, headmaster's 'fever' rises | दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा, मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला

दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा, मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला

चाैकट...

हे साहित्य कस्टडीत...

जिल्ह्यात अद्याप दहावी अथवा बारावीच्या मुख्य पेपरसाठीच्या काेऱ्या उत्तरपत्रिका आलेल्या नाहीत. प्रॅक्टिकल परीक्षेच्या मार्कशीट मिळाल्या आहेत. यासाेबतच परीक्षेसाठी लागणारे अन्य साहित्यही आले आहे. हे सर्व साहित्य सांभाळण्यासाठी त्या-त्या शाळेकडून स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे काम जबाबदारीचे असल्याने खासकरून मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे.

मुख्याध्यापकांच्या प्रतिक्रिया...

आमच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी मुख्य पेपरच्या उत्तरपत्रिका व साहित्य प्राप्त झालेले नाही. फक्त प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य व गुणयाद्या आल्या आहेत. त्या सांभाळण्याची जबाबदारी एका लिपिकावर सोपवली आहे.

व्ही. एस. पवार, मुख्याध्यापक, विद्याभवन हायस्कूल, कळंब

आमच्या शाळेत मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिका मिळालेल्या नाहीत. मागच्या नऊ तारखेला फक्त प्रॅक्टिकल परीक्षेच्या मार्कशीट आल्या आहेत. सदर साहित्य एचएससी विभागाचे प्रमुख असलेल्या शिक्षकांच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

एस. व्ही. मोकाशी, मुख्याध्यापक, जि. प. प्र‌शाला, इटकूर.

२२६७५

दहावी

१३९५२

बारावी

परीक्षा कधी?

परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाकडून सर्व तयारी करण्यात आली हाेती. केंद्रांची संख्या निश्चित करण्यासाेबतच भरारी पथके, बैठी पथकेही स्थापन करण्यात आली हाेती.

असे असतानाच काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने दहावी, बारावी अशा दाेन्ही वर्गांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

हा आदेश काढताना शासनाने परीक्षा नेमक्या कधी हाेतील, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या काेऱ्या उत्तरपत्रिका व इतर साहित्य सांभाळण्याची नामुष्की ओढावली आहे.

परीक्षा नेमक्या कधी हाेणार? याबाबत स्थानिक शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, तूर्तास सांगता येणार नाही. कारण परीक्षा बाेर्डाकडून अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Tenth-twelfth grade answer sheets hit schools, headmaster's 'fever' rises