विद्यालयास दहा ग्रीन बोर्डची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:32 IST2021-03-18T04:32:24+5:302021-03-18T04:32:24+5:30

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालयास सन २००५ ला दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून दहा ग्रीन बोर्ड ...

Ten green boards help the school | विद्यालयास दहा ग्रीन बोर्डची मदत

विद्यालयास दहा ग्रीन बोर्डची मदत

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालयास सन २००५ ला दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून दहा ग्रीन बोर्ड व शालेय साहित्याची मदत देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे होते.

मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, उपमुख्याध्यापक विनोद कदम यांची उपस्थिती होती.

माजी विद्यार्थी पुरूषोत्तम बोंगरगे, रामकृष्ण भोसले, नागेश चव्हाण, शिवशंकर गुंजोटे यांनी विद्यालयास दिलेले हे दहा ग्रीन बोर्ड रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक ठोंबरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले.

यावेळी सहशिक्षक कैलास बोंगरगे, किरण गायकवाड, मकरंद पाटील, जयहिंद पवार, सिद्धलिंग स्वामी, विठ्ठल नाईक, महेश यादव आदी उपस्थित होते.

फोटो--- अणदूर येथील जवाहर विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दिलेले ग्रीन बोर्डाचे स्वीकारताना मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे आदी.

Web Title: Ten green boards help the school