शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद येथे भरधाव वेगातील टेम्पो ट्रकवर आदळला; शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:54 IST

इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपाकडे वळणाऱ्या ट्रकवर भरधाव वेगातील टेम्पो आदळला. या अपघातात टेम्पोतील शेतकरी जागीच ठार झाला.

वाशी (उस्मानाबाद) : इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपाकडे वळणाऱ्या ट्रकवर भरधाव वेगातील टेम्पो आदळला. या अपघातात टेम्पोतील शेतकरी जागीच ठार झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सरमकुंडी शिवारातील पेट्रोलपंपानजीक घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील औरंगाबाद  ते सोलापूर या महामार्गावरील सरमकुंडी शिवारात मोटे यांचा पेट्रोलपंप आहे. सरकी पेंड घेऊन जाणारा ट्रक (क्र.एमएच.१२/क्यूए.९६३६) इंधन भरण्यासाठी सदरील पेट्रोलपंपवार जात होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला टेम्पो (क्र. एमएच.१०/५७८०) संबंधित ट्रकवर जावून आदळाला. 

या भिषण अपघातात टेम्पोमध्ये बसलेले शेतकरी सुभाष बाबुराव तळेकर  (वय ५०, रा. शहापूर, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोचालक कृष्णा  परमेश्वर भाकड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान,  टेम्पोची धडक ही ट्रकच्या डिझेलच्या टाकीला बसल्यामुळे ट्रकने पेट घेतला. या आगीमध्ये ट्रकसह सरकी पेंडही जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोनि सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल रणदिवे हे घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग