उमरगा शाळेला पथकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:49+5:302021-02-06T04:59:49+5:30

उमरगा : येथील आयएसओ मानांकीत जिल्हा परिषद हायस्कूलला बुधवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने भेट दिली. ‘ ...

Team visit to Umarga School | उमरगा शाळेला पथकाची भेट

उमरगा शाळेला पथकाची भेट

उमरगा : येथील आयएसओ मानांकीत जिल्हा परिषद हायस्कूलला बुधवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने भेट दिली.

‘ एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत डाएटचे अधिव्याख्याता पी. बी. शिंदे, समाजशास्त्राच्या अधिव्याख्यात्या सुचित्रा जाधव, समुपदेशक कदम यांच्या पथकाने बुधवारी दिवसभर शाळेत थांबून पाचवी ते दहावीच्या वर्गांची गुणवत्ता तपासणी केली. तंत्रस्नेही शिक्षक संजय रुपाजी यांनी तयार केलेली ‘आमची शाळा, आमचे उपक्रम’ या पीपीटीचे सादरीकरण करून उपक्रमाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सूत्रसंचालन सरिता उपासे यांनी केले. आभार सदानंद कुंभार यांनी मानले.

यावेळी क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव, बलभीम चव्हाण, बशीर शेख, ममता गायकवाड, शिल्पा चंदनशिवे, नारायण अंकुशे उपस्थित होते.

Web Title: Team visit to Umarga School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.