संचालकपदी सुयोग अमृतराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST2021-01-24T04:15:30+5:302021-01-24T04:15:30+5:30

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील व्यवस्थापन शास्त्र विभाग संचालकपदी डॉ. सुयोग अरुणराव अमृतराव यांची नियुक्ती करण्यात ...

Suyog Amritrao as Director | संचालकपदी सुयोग अमृतराव

संचालकपदी सुयोग अमृतराव

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील व्यवस्थापन शास्त्र विभाग संचालकपदी डॉ. सुयोग अरुणराव अमृतराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिले. डॉ. अमृतराव हे व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक असून, विद्यापीठातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी संभाळले आहेत.

जिल्हा परिषदेत अभिवादन कार्यक्रम

उस्मानाबाद : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केले. यावेळी सभापती दत्तात्रय साळुंके, शिक्षणाधिकारी डॉ. ए. बी. मोहरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय बालिका दिन सप्ताह

उमरगा : एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात ‘राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहा’स प्रारंभ झाला. या निमित्ताने शनिवारी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अंतर्गत ‘किमान आम्ही विद्यार्थिनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू. अर्ध्यात आम्ही शिक्षण सोडणार नाही’, अशी शपथ मुलींना देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे, अजित साळुंके, आदी उपस्थित होते.

Web Title: Suyog Amritrao as Director