उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST2021-03-04T05:01:29+5:302021-03-04T05:01:29+5:30
कारी : उस्मानाबाद कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने चालू उन्हाळी हंगामात सोयाबीन या पिकाचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन ...

उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम
कारी : उस्मानाबाद कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने चालू उन्हाळी हंगामात सोयाबीन या पिकाचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेण्यात आले आहे. यासाठी विशेष बीजोत्पादन मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. याअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी येथे सहभागी बीजोत्पादकांना महाबीज व बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या वतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजू माने यांनी सोयाबीन पिकांची बीजप्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण, पिकातील अन्य जातींची भेसळ काढणे व पाणी व्यवस्थापन या विषयांवर माहिती दिली. यासोबतच मिसाळ, गोरे, माळी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी बळीराम बिराजदार, गीतांजली शेळके, अरुण लांडे, रहिमान काझी, शमशोद्दीन शेख, पाठक, आवटे यांनी पुढाकार घेतला.