कळंब येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची छात्तीत गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:17 IST2018-01-25T15:15:26+5:302018-01-25T15:17:20+5:30
कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना यांनी स्वतःच्या छातीत पिस्टलमधील गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज सकाळी घडली.

कळंब येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची छात्तीत गोळी झाडून आत्महत्या
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना यांनी स्वतःच्या छातीत पिस्टलमधील गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज सकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितिन कटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
तालुक्यात येरमाळा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. याठिकाणी अडीच वर्षापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून विनोद चव्हाण हे कार्यरत आहेत. चव्हाण हे आपली पत्नी मोनासह गावातील लक्ष्मी-पार्वती नगर भागातील माणिक आगलावे यांच्या घरी राहतात. याच ठिकाणी आज सकाळी ११ ते ११.३० च्या मोना यांनी घरातील चव्हाण यांच्या पिस्टलमधील गोळी छातीत झाडून घेतली. यानंतर त्यांना तातडीने बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितिन कटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.