पखरूड येथील विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST2021-05-12T04:33:27+5:302021-05-12T04:33:27+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पखरूड येथील शिक्षक विठ्ठल चव्हाण यांची पत्नी सारिका चव्हाण (वय ३५) यांनी ...

Suicide of a married woman at Pakhrud by jumping into a well | पखरूड येथील विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पखरूड येथील विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पखरूड येथील शिक्षक विठ्ठल चव्हाण यांची पत्नी सारिका चव्हाण (वय ३५) यांनी ईट शिवारातील गपाट यांच्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ११ मे राेजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ईट औटपाेस्टचे पाेलीस हेड काॅन्स्टेबल ए. ए. कुटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यानंतर विवाहितेचा शव विहिरीबाहेर काढून ईट प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठवून उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, संबंधित विवाहितेने आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पाेहेकाॅ ए. ए. कुटे करीत आहेत. मृत सारिका यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Suicide of a married woman at Pakhrud by jumping into a well