गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:53+5:302021-01-21T04:29:53+5:30
चव्हाण पॅनलने मारली बाजी मुरुम : उमरगा तालुक्यातील गणेशनगर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसच्याच दोन पॅनलमध्ये दुरंगी ...

गळफास लावून आत्महत्या
चव्हाण पॅनलने मारली बाजी
मुरुम : उमरगा तालुक्यातील गणेशनगर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसच्याच दोन पॅनलमध्ये दुरंगी सामना रंगला. यामध्ये संजय चव्हाण यांच्या पॅनलला पाच तर विरोधी पॅनलला दोन जागा मिळाल्या. विजयी उमेदवारांमध्ये उषा संजय चव्हाण, शांताबाई पवार, सतीश पवार, रोहिदास जाधव, शोभा राठोड व विरोधी पॅनलचे सुभाष जाधव, छबाबाई राठोड यांचा समावेश आहे.
मुरूम येथे क्रिकेट स्पर्धा
मुरुम : येथील शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारपासून दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील जवळपास ६० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शहरातील पालिकेच्या मैदानात या स्पर्धा होत असून, मित्रमंडळाच्या वतीने मागील महिनाभरापासून याची तयारी सुरू आहे.
२५ दात्यांनी केले रक्तदान
उस्मानाबाद : येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५ जणांनी सहभाग नोंदविला. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव ॲड. मिलिंद पाटील, प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, रासेयो विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मकरंद चौधरी, प्रा. दिनकर रासवे यांची उपस्थिती होती. शिबिरासाठी डॉ. हरिश्चंद्र गालीयाल, दिलीप बनसोडे, अमृता चव्हाण, अनिल जांभळे, नीलिमा हेगडे आदींनी पुढाकार घेतला.
ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलचा विजय
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी ग्रामपंचायत निवडणुकीत देवराज मित्रमंडळप्रणीत ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये हणुमंत रामचंद्र जाधव, शालुबाई ज्ञानदेव जाधव, लक्षी बाळासाहेब जाधव, शांताबाई रामचंद्र नवगिरे, राम ज्ञानदेव कोळी, विकास मच्छिंद्र थोरात यांचा समावेश आहे.
दिलीप पाटील महाराज यांची नियुक्ती
उस्मानाबाद : अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा अपंग समिती अध्यक्षपदी सांजा येथील हभप दिलीप अण्णासाहेब पाटील महाराज यांची नियुक्ती झाली. जिल्हा कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव महाराज सस्ते (गुरूजी), जिल्हा उपाध्यक्ष भरत महाराज शेरकर, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पांडुरंग महाराज कोळगे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव हनुमंत ढोले, कळंब तालुकाध्यक्ष बाबासाहेब महाराज उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब जमदाडे यांचे निधन
(फोटो : गोविंद खुरूद)
तुळजापूर : येथील सारा गौरव भागातील रहिवासी रावसाहेब दत्तोबा जमदाडे (वय ८१) (मूळ गाव कामठा) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आपसिंगा रस्त्यावरील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्व. जमदाडे हे भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते.