शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

परंडा येथे ऊस वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:35 IST

: राज्यातील साखर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप करत ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने आज दुपारी परंंडा शहरात रास्तारोको करण्यात आंदोलन करण्यात आले.

परंडा (उस्मानाबाद ) : राज्यातील साखर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप करत ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने आज दुपारी परंंडा शहरात रास्तारोको करण्यात आंदोलन केले.  डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक टिपरूही उचलणार नसल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम मोरे यांनी यावेळी दिला़

महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे़ ऊस वाहतूक ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत़ मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उसाचे एक टिपरुही उचलणार नसल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम मोरे यांनी दिला. परंडा- बार्शी- करमाळा- कुर्डवार्डी राज्य मार्गावरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडीराम पाटील, बाबासाहेब चव्हाण, बापू मिस्कीन,  तालुका उपाध्यक्ष मनोज काळे,  लक्ष्मण मोरे, तालुका सचिव समाधान गरदडे, नवनाथ गाडे, नामदेव भोरे, संतोष सोनवर, गोकुळ खैरे, राजेंद्र राऊत, जाकीर मुल्ला, फकीर पावले, हनुमंत बंडगर, अशोक खैरे, अतुल थिटे, बापू विटकर, लक्ष्मण देशमुख, धनाजी चोबे आदी उपस्थित होते. जवळपास एक तास आंदोलन करण्यात आले़ रस्तारोको आंदोलनात मोठया संख्येने वाहतूक ठेकेदार सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार तुषार बेरकर यांनी निवेदन स्विकारले. परंडा पोलीस ठाण्याचे फौजदार संतोष माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या आहेत मागण्या :- वाहतूक दर व कमिशन दर दुप्पट करून महाराष्ट्रातील सर्व कारखान्यात एकच दर लागू करावा, ही दरवाढ दरवर्षी सुधारित करण्यात यावी

-  ऊस वाहतूक ठेकेदार व ऊस तोडणी ठेकेदारांचे स्वतंत्र करार करावेत

-  अ‍ॅडव्हान्सची रक्कम वाहतूक ठेकेदारांना एकरकमी द्यावी

- अ‍ॅडव्हान्ससाठी कर्ज प्रकरण करताना हे कर्ज प्रकरणे बँकांनी थेट वाहतूकदारांसोबत करावे

-  कारखान्यांनी दुहेरी करार करून कारखान्यांचे वाहतूक दर, कमिशन दर वाढवून द्यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या़

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्रagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद