निशा आडेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:07+5:302020-12-29T04:30:07+5:30

चौघांवर कारवाई उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लक्ष्मण पवार, सचिन चव्हाण व किसन साळुंके हे तिघे कल्याण मटका ...

The success of Nisha Aade | निशा आडेचे यश

निशा आडेचे यश

चौघांवर कारवाई

उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लक्ष्मण पवार, सचिन चव्हाण व किसन साळुंके हे तिघे कल्याण मटका जुगाराचे साहित्य, एक मोबाईल व रोख ८ हजार ९५० रुपयांसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच ढोकी पोलिसांनी नारायण येडके (रा. ढोराळा) याच्यावरही कारवाई केली.

दारू जप्त

ढोकी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने २६ डिसेंबर रोजी गावातील ‘दोस्ती ढाबा’ येथे छापा टाकला. यावेळी येथील संजय कोळी (रा. ईर्ला) याने देशी-विदेशी दारूच्या ५३ बाटल्या अवैधरित्या बाळगल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करीत त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

अशुद्ध पाणीपुरवठा

(फोटो :बालाजी बिराजदार २८)

लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये मागील सहा महिन्यांपासून जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील रहिवाशांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात नगरपंचायतीला कल्पना देऊन देखील दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विनोद लांडगे यांनी केला आहे.

अपघाताचा धोका

(फोटो : गणेश कुलकर्णी २८)

उस्मानाबाद : शहरातील स्काऊट-गाईड कार्यालयासमोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाने सदरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

Web Title: The success of Nisha Aade