विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास वाचन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:13+5:302021-09-22T04:36:13+5:30
तुळजापूर : नियमित पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानात मोठी भर पडते. यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास पुस्तक वाचन करणे ...

विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास वाचन करावे
तुळजापूर : नियमित पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानात मोठी भर पडते. यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास पुस्तक वाचन करणे गरजेचे आहे. परंतु, सध्याचा विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याने वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार होतात. परंतु , सर्वज्ञानी विद्यार्थी तयार होत नाही. यासाठी घरातील पालकांनी देखील आपल्या पाल्याला पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन पुणे येथील पुस्तक मित्र अविनाश निमसे यांनी केले.
येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागाच्या वतीने ‘पुस्तक वाचन व त्याचे फायदे’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. प्रारंभी प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड यांच्या हस्ते निमसे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यानंतर निमसे दाम्पत्यांनी ग्रंथपाल गंगाधर मेथेकर यांच्यासोबत ग्रंथालयाची पाहणी केली. प्रास्ताविक प्रा. प्रदीप हंगरगेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना निमसे यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांना वाचण्यासाठी दहा पुस्तके भेट दिली. आभार प्राध्यापक नागनाथ राऊत यांनी मानले.