विद्यार्थ्यांनी केले ‘रेड टू मीट’ ॲप डाऊनलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:53+5:302021-03-07T04:29:53+5:30
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या ...

विद्यार्थ्यांनी केले ‘रेड टू मीट’ ॲप डाऊनलोड
कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये शिक्षक दिलीप चौधरी यांनी ‘रेड टू मीट स्टुडंट्स’ हे ॲप इन्स्टॉल करून दिले.
या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी, विज्ञान यासह सर्व विषयांचे व्हिडीओ स्वाध्याय, संदर्भ ग्रंथ, अवघड संकल्पना पाहता येणार आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमदेखील विद्यार्थ्यांना याद्वारे समजणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा ॲप मोफत देण्यात येत आहे. शाळेची वेळ कमी असून, इतर वेळेत विद्यार्थ्यांनी मोबाईलवर इतर गोष्टी पाहण्यापेक्षा हे ॲप वापरल्यास त्यांच्या अभ्यासातील गती वाढणार आहे. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी वाघ, दिलीप चौधरी, दत्तात्रय हाजगुडे, उत्तम शेंडगे, स्वाती बनसोडे आदी उपस्थित होते.