शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत विद्यार्थिनीचा विनयभंग; संतप्त पालकांनी शिक्षकाला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:02 IST

उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेत शहरातीलच एक विद्यार्थिनी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़

ठळक मुद्देभेदरलेल्या विद्यार्थिनीने रडत-रडतच घर गाठलेआरोपी शिक्षकास केले अटक

उस्मानाबाद : शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ यानंतर संतप्त पालकांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला़ याप्रकरणी शिक्षकावर सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेत शहरातीलच एक विद्यार्थिनी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़ दरम्यान, वर्गात कोणीही नसताना या शाळेतीलच एक ५० वर्षीय शिक्षक या विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करीत होता़ सातत्याने हा प्रकार होत असताना शिक्षक विद्यार्थिनीस धमकावत असल्याचेही कळते़ दरम्यान, शनिवारीही या शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीसोबत पुन्हा चाळे केले़ यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीने रडत-रडतच घर गाठून कुटूंबियांना याबाबतची कल्पना दिली़ मात्र, रविवारची शाळेला सुटी असल्याने या प्रकाराला वाचा फुटली नाही़ सोमवारी मात्र, पालकांनी शिक्षकाला घेरून चांगलेच चोपले.

आरोपी शिक्षकाला अटकसोमवारी सकाळी शाळा उघडताच पीडित विद्यार्थिनीचे पालक व काही नागरिकांनी शाळेत धाव घेतली. संतापलेल्या पालक, नागरिकांनी त्याला तेथेच झोडपण्यास सुरुवात केली़ या शिक्षकास चोप देत पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन करुन तक्रार नोंदविली़ त्यानुसार आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी शिक्षकास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कस्तुरे यांनी दिली़  या शिक्षकाला यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते़  

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळStudentविद्यार्थीOsmanabadउस्मानाबादPoliceपोलिस