विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:20+5:302021-03-07T04:29:20+5:30
भूम : नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आरसोली येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी भूम ...

विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
भूम : नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आरसोली येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
अरसोली येथील संजय हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी साक्षी सुरेश जोशी (वय १५) ही तिचा लहान भाऊ चैतन्य व आईवडिलांसह आजोबा अरुण कुलकर्णी यांच्याकडे अनेक दिवसांपासून राहतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे साक्षी दुपारी १ वाजता शाळेतून घरी आली. यावेळी घरातील सर्व जण शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तिचे मामा उदय कुलकर्णी हे दुधाचे कॅन आणण्यासाठी घरी आले असता, त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले. त्यांनी जोरजोरात आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने काचेची खिडकी फोडून आत पाहिले असता साक्षीने छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
भूम पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवला. साक्षी हिच्यावर रात्री १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आजोबा अरुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरून भूम पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ राकेश पवार करीत आहेत.