आदित्य गोरे यांच्या वाहनावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST2021-08-19T04:36:00+5:302021-08-19T04:36:00+5:30

कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअरच्या वतीने अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने भूम तालुक्यातील जातेगाव व ...

Stone pelting on Aditya Gore's vehicle | आदित्य गोरे यांच्या वाहनावर दगडफेक

आदित्य गोरे यांच्या वाहनावर दगडफेक

कोरोनाने आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअरच्या वतीने अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने भूम तालुक्यातील जातेगाव व कुक्कडगाव या ठिकाणी अशा अनाथ मुलांना भेटण्यासाठी आदित्य गोरे हे उस्मानाबादहून निघाले होते. त्यांची कार (क्र. एमएच २५ / एएल ००२०) राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पारडी फाटा येथून भूमच्या दिशेने जात असताना मागील बाजूने गाडीवर अज्ञाताने दगडफेक केली. यावेळी पुढील कार्यक्रम असल्याने गोरे यांनी गाडी न थांबवता तसाच प्रवास चालू ठेवला.

दरम्यान, या दगडफेकीत गाडीच्या मागच्या बाजूची काच फुटली असून, यामध्ये गाडीमधील आदित्य गोरे व कळंबचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी समाधान बाराते हे दोघेही सुखरूप असल्याचे गोरे यांनी सांगितले. या घटनेबाबत वाशी पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली असून, कार्यक्रम संपताच ठाण्यात येऊन तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Stone pelting on Aditya Gore's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.