शिराढाेण येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST2021-04-05T04:28:38+5:302021-04-05T04:28:38+5:30
शुद्ध पाणीपुरवठा करणारे मशीन कार्यान्वित कळंब -कळंब पालिकेच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठा करणारे स्वयंचलित यंत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात ...

शिराढाेण येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू
शुद्ध पाणीपुरवठा करणारे मशीन कार्यान्वित
कळंब -कळंब पालिकेच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठा करणारे स्वयंचलित यंत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यान्वित करण्यात आले आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना अत्यल्प दरात यामुळे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. याच प्रकारची स्वयंचलित पाणी शुद्ध करणारी यंत्रणा नवीन बसस्थानक, स्वा. सावरकर चौक, प्रशासकीय इमारती, न्यायालय परिसर तसेच प्रभागनिहाय बसाविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होते आहे.
पथदिवे चालू करण्याची मागणी
कळंब -शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच काही प्रभागातील पथदिवे मागील १५ दिवसापासून बंद असल्याने शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या बंद पथदिव्यामुळे रात्री वाहने चालविणे तसेच पायी चालणेही कठीण झाले आहे. बाजारपेठ बंद करायची रात्री ७ ची वेळ प्रशासनाने ठरवून दिल्याने बाजारपेठेत ७ नंतर शुकशुकाट होतो. त्यातच पथदिवे बंद असल्याने चोरटे, अवैध धंदे करणाऱ्यांचे फावत आहे.