‘पोकरा’ अंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन योजना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:20+5:302021-06-20T04:22:20+5:30
कळंब तालुक्यातील काही ठरावीक ग्रामीण भागात पोकरा योजना चालू केली होती. भूमिहीन मागासवर्गीयांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. ...

‘पोकरा’ अंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन योजना सुरू करा
कळंब तालुक्यातील काही ठरावीक ग्रामीण भागात पोकरा योजना चालू केली होती. भूमिहीन मागासवर्गीयांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी या योजनेकरीता ऑनलाईन अर्ज केले. परंतु, लाभधारकांना याचा लाभ मिळाला नाही. शेती उपयोगी सर्व योजना पाईपलाईन, तुषार सिंचन, विहीर, ठिबक सिंचन, फळबागा तसेच नांगर पेरणी यंत्र हे सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु पोकरा योजनेतील शेळी पालन, कुक्कुटपालन या दोन योजना गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे त्या तत्काळ चालू कराव्यात, असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. यावर अजित पिंगळे, सुनील ताटे, गहिनीनाथ खंडागळे, संभाजी गायकवाड, सतपाल बनसोडे, मकरंद पाटील, शिवाजी गिड्डे, भैया बावीकर, संजय जाधवर, माणिक बोंदर, हनुमंत शेळके आदींच्या सह्या आहेत.