अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:26+5:302021-02-10T04:32:26+5:30

कळंब : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करून महामंडळ बचाव ...

Start Annabhau Sathe Vikas Mahamandal | अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करा

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करा

कळंब : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू करून महामंडळ बचाव समिती स्थापन करावी, तसेच अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर येथे राष्ट्रीय स्मारक लवकर उभारावे, आदी मागण्यांबाबत मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, लहुजी साळवे अभ्यास आयोगाची शिफारस लागू करावी, संगमवाडी (पुणे) येथे लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अ, ब, क, ड, आरक्षण वर्गीकरण करावे, ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ स्थापन करावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, शहराध्यक्ष सनी कांबळे, संतोष मोरे, दिलीप मोरे, नवनाथ क्षीरसागर, आशा शिंदे, रामकृष्ण कांबळे, अशोक गायकवाड, नारायण कोल्हे, विलास झोंबाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Start Annabhau Sathe Vikas Mahamandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.