चौक सुशोभिकरण संकल्प चित्राचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST2021-04-14T04:29:27+5:302021-04-14T04:29:27+5:30
तुळजापूर : शहर विकास प्राधिकरणअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण कामाच्या संकल्प चित्राचे अनावरण सोमवारी येथील नगर परिषद ...

चौक सुशोभिकरण संकल्प चित्राचे अनावरण
तुळजापूर : शहर विकास प्राधिकरणअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण कामाच्या संकल्प चित्राचे अनावरण सोमवारी येथील नगर परिषद कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विजय कंदले, किशोर साठे, औदुंबर कदम, तानाजी कदम, संगीता कदम उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच सदरील पुर्णाकृती पुतळ्याबाबतच्या सर्व मंजुऱ्यादेखील मिळाल्या असल्याचे नगराध्यक्ष रोचकरी यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या येणाऱ्या बैठकीत सदरील प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर वाढीव रकमेच्या मंजुरीसाठी सदरील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, तेथून मंजुरी आल्यानंतर सदरील प्रस्तावाची निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असेही रोचकरी म्हणाले.