शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याने अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला!

By बाबुराव चव्हाण | Updated: May 6, 2023 16:00 IST

सांगवीतील शेतकरी हवालदिल; चार ते पाच रुपये किलाे दराने विकण्याची नामुष्की

तामलवाडी ( धाराशिव) : बाजारपेठेत कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. चार ते पाच रुपये किलाे एवढा अत्यल्प दर मिळत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून काढणी आणि काटणीचाही खर्च निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शेतकऱ्याने सुमारे दाेन एकरातील कांदा पिकावर कुळव फिरवून अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला.

शेतकरी ज्ञानदेव भानुदास मगर यांची सोलापूर- धुळे महामार्गालगत सांगवी काटी शिवारात शेतजमीन आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांनी दोन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली हाेती. कांदा काढणीला येईपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला. मात्र, कांदा बाजारपेठेत दाखल हाेताच दर काेसळले. सध्या प्रति किलाे चार ते पाच रुपये एवढा अत्यल्प दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून कांद्याची काढणी व काटणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मगर यांनी सुमारे दाेन एकर क्षेत्रातील पिकावर कुळव फिरवून थाेडाथाेडका नव्हे तर अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला. दरम्यान, सांगवी शिवारातील अन्य शेतकरीही हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि उष्णतेमुळे काढणी झालेला कांदाही खराब हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बाजारात दर मिळत नाही आणि दुसरीकडे कांदा टिकतही नसल्याने शेतकऱ्यांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला आहे.

६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही...शेतकरी ज्ञानदेव मगर यांनी दाेन एकरातील कांदा पिकावर सुमारे ६० हजार रुपये खर्च केला. मात्र, बाजारपेठेत दर मिळत नसल्याने त्यांनी हा कांदा शेतातील मातीत गाडला. पदरमाेड हाेऊनही हाती दमडीही पडली नसल्याने शेतकरी मगर हवालदिल झाले आहेत. अशीच काहीशी अवस्था गावातील अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

ना अनुदान, ना मदत...कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान बाजारात विक्री झालेल्या कांद्यासाठीच लागू आहे. मात्र, दुसरीकडे काढलेला कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही हाती पडत नसल्याने शेतकरी कांदा जमिनीत गाडू लागले आहेत. अशा शेतकऱ्यांना काेण मदत देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादagricultureशेतीonionकांदा