‘एस.पी. शुगर’चे आज राेलर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:50+5:302021-07-24T04:19:50+5:30

राज्याचे सर्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आगमन शनिवारी सकाळी ९ वाजता कसबे तडवळे येथे हाेईल. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार ...

‘S.P. Sugar's worship today | ‘एस.पी. शुगर’चे आज राेलर पूजन

‘एस.पी. शुगर’चे आज राेलर पूजन

राज्याचे सर्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आगमन शनिवारी सकाळी ९ वाजता कसबे तडवळे येथे हाेईल. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार हे उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला राज्यमंत्री बनसोडे हे कसबे तडवळे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियाेजित स्मारकाला भेट देतील. यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरओ प्लान्टचे लाेकार्पण करतील. या साेहळ्यानंतर १० वाजता एस. पी. शुगर या कारखान्याचे त्यांच्या हस्ते राेलर पूजन हाेईल, अशी माहिती एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली.

एस पी शुगर कारखाना

संजय बनसोडे

Web Title: ‘S.P. Sugar's worship today