शेतकऱ्यांसाठी पेरणी यंत्राची केली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:23+5:302021-06-24T04:22:23+5:30

ईट : भूम तालुक्यातील चांदवड येथील विजयकुमार कावळे व संजय कावळे यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या व कृषी विभाग यांच्या ...

Sowing facility for farmers | शेतकऱ्यांसाठी पेरणी यंत्राची केली सोय

शेतकऱ्यांसाठी पेरणी यंत्राची केली सोय

ईट : भूम तालुक्यातील चांदवड येथील विजयकुमार कावळे व संजय कावळे यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीएफ पेरणी यंत्र तयार केले असून, ते चांदवड मधील शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध करून दिले आहे. चालू हंगामात आयसीआयसीआय फाउंडेशनने भूम आणि वाशी तालुक्यातील मांडवा, घाटपिंपरी, अंजनसोंडा, तांदुळवाडी, इंदापूर या गावांमध्ये २०० एकर क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अनुषंगाने चांदवड येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचे फायदे व महत्व याबाबत माहिती दिली. यावेळी कृषी विभाग पोकराचे गणेश शेंडगे, फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्निल ढेकळे, तालुका समन्वयक हरिदास कारंडे, सरपंच अशोक माने, माजी सरपंच मच्छिंद्र कावळे, संजय कावळे, रघुनाथ कावळे, भास्कर पाटील, अंकुश पाटील, बाबूराव कावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Sowing facility for farmers