विजेचा धक्का बसून मुलगा ठार, पिता जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST2021-09-07T04:39:32+5:302021-09-07T04:39:32+5:30

याविषयी माहिती अशी की, बैलपाेळा सणाच्या दिवशी शेतामधील देवाला नारळ फोडण्यासाठी येथील व्यावसायिक तथा तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी पद्मराज ...

Son killed, father injured in electric shock | विजेचा धक्का बसून मुलगा ठार, पिता जखमी

विजेचा धक्का बसून मुलगा ठार, पिता जखमी

याविषयी माहिती अशी की, बैलपाेळा सणाच्या दिवशी शेतामधील देवाला नारळ फोडण्यासाठी येथील व्यावसायिक तथा तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी पद्मराज नवनाथ गपाट (वय ४२) व मुलगा निखिल पद्मराज गपाट ( वय १८) गेले होते. बांधावरून जात असताना पिकामध्ये डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडून लावण्यात आलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. या तारेमुळे विद्युत धक्का बसून निखिल गपाट याचा जागीच मृत्यू झाला, तर निखिलला वाचविण्यासाठी गेलेले पद्मराज गपाट गंभीर जखमी झाले. दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मुलास मृत घोषित केले, तर वडिलांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पाेलिसांत आकस्मित मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Web Title: Son killed, father injured in electric shock