५ तोळ्यांचे गंठन हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST2021-02-13T04:32:06+5:302021-02-13T04:32:06+5:30
उस्मानाबादच्या प्रमिला नगर भागात राहणार्या सविता भागवत गाडे या काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी घराकडे निघाल्या ...

५ तोळ्यांचे गंठन हिसकावले
उस्मानाबादच्या प्रमिला नगर भागात राहणार्या सविता भागवत गाडे या काही दिवसांपूर्वी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी घराकडे निघाल्या होत्या. बँक कॉलनी भागात गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सविता गाडे यांनी ११ फेब्रुवारी रोजी आनंदनगर ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत गेले ५ लाखांचे दागिने...
कळंब येथे घडलेल्या घरफोडीत जवळपास ५ लाखांचे दागिने लंपास झाले आहेत. कळंबच्या दत्त नगर भागात राहणार्या अरुणा संजय करंजकर या ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत बाहेर गावी गेल्या होत्या. याच काळात अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करीत घरात ठेवलेली काही रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ९२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. याबाबत गुरुवारी कळंब ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.