मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमच्या नगराध्यक्ष सुप्रिया वारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी आज भाजपात प्रवेश केला. गटनेते संजय गाढवे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश घेण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी सर्वांचे स्वागत केले.या घडामोडीमुळे भूम नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. त्या ठिकाणी गेल्या डिसेंबरमध्ये निवडणूक झाली होती. शहराच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये नगराध्यक्ष सुप्रिया वारे, उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे,संजय गाढवे, नगरसेवक संजय पवार, तौफिक कुरेशी, संजय देवडीकर, धनाजी मस्कर, सागर टकले, सादिक मोमीन, सुमन मांजरे आणि करुणा शिंदे यांचा समावेश आहे.
भूमचे सोळा नगरसेवक भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:27 AM