तुळजापूर शहरात सहा लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:07+5:302021-06-19T04:22:07+5:30
यातील तुळजापूर (खुर्द) येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मधील पहिल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या ...

तुळजापूर शहरात सहा लसीकरण केंद्र
यातील तुळजापूर (खुर्द) येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मधील पहिल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेविका मंजुषा देशमाने, किशोर साठे, पंडितराव जगदाळे, विजय कंदले, नारायण नन्नवरे, राजाभाऊ देशमाने, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयास केंद्र शासनाचे राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते तुळजाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तुळजापूर (खुर्द) यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव, डॉ. डी. बी. कमठाणे, आरोग्य पर्यवेक्षक पांडागळे, रुग्णसेवा समिती सदस्य आनंद कंदले यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा’ हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके आणि मुख्याधिकारी आशिष लोकर यांनी या केंद्रास भेट दिली.
लसीकरण केंद्रावर शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी मुख्याध्यापक तुकाराम मोठे, सहशिक्षक अशोक शेंडगे, साळुंके, प्रफुल्ल खंडागळे, प्रमोद भोजने, के. ए. लोहारे, अमर ताकमोगे, संजय इंगळे, वेदप्रकाश औटी, शालन माने तसेच तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.