निलेगाव येथे स्मशानभूमीसाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:41+5:302021-01-23T04:33:41+5:30
निलेगाव येथे धनगर, तसेच कैकाडी, मराठा समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची साेय हाेती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘त्या’ जागेवर बांधकामही झाले हाेते, परंतु ...

निलेगाव येथे स्मशानभूमीसाठी ठिय्या
निलेगाव येथे धनगर, तसेच कैकाडी, मराठा समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची साेय हाेती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘त्या’ जागेवर बांधकामही झाले हाेते, परंतु २०१६ मध्ये हे काम पाडल्याच्या कारणावरून आजतागायत वाद सुरू आहे. तेव्हापासून समाजबांधव स्मशानभूमीच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. प्रत्येक वेळी केवळ आश्वासनावर बाेळवण झाली. सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, समाजबांधवांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी ठिय्या आंदाेलन सुरू केले. तुळजापूर तहसीलदार यांनी आंदाेलनस्थळी येऊन चर्चा केल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. दरम्यान, नळदुर्ग पाेलीस ठाण्याचे सपाेनि जगदीश राऊत यांनी ‘स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊन या ठिकाणी संबंधित अधिकार्यांना बाेलावून घेऊ,’ असे आश्वासन दिले. यानंतर, नागरिकांनी आंदाेलन मागे घेतले. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख धनाजी सातपुते, मंडळ अधिकारी शिंदे, तलाटी अंजुषा नाबदे, नुरखा सौदागर, नामदेव दूधभाते, हनुमंत सोनटक्के, म्हाळाप्पा बंदीछोडे, दगडू दूधभाते, निर्मलाताई मोरे, संजय देशमुख, प्रकाश जमादार, बसवराज जमादार, पिंटू दूधभाते आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
स्मशानभूमीची मागणी न झाल्यास मल्हार सेनेच्या माध्यमातून, तसेच विविध संघटनांकडून येत्या २७ जानेवारीपासून जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा अशारा यावेळी आंदाेलकांनी दिला.