एकल महिलांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:18+5:302021-03-09T04:35:18+5:30
वाशी : जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेच्या वतीने सोनारवाडी येथे महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ...

एकल महिलांचा मेळावा
वाशी : जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेच्या वतीने सोनारवाडी येथे महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपसरपंच अनुसया घोळवे होत्या. यावेळी ग्रा. पं. सदस्य तथा उमेदच्या कार्यकर्त्या कोमल घोळवे यांनी महिलांनी संघटित होऊन, जागृत राहून आपले नाव जमिनीच्या सातबारा व ग्रामपंचायतीच्या ८ अ च्या मिळकतीवर लावून घ्यावे, असे आवाहन केले. जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी एकल महिलांचे प्रश्न, विधवा, परितक्त्या, गरजू महिलांना मान-सन्मानाने जगता यावे, यासाठी संघटना बांधणी गरजेचे असल्याचे सांगितले. यानंतर उपस्थित महिलांना मास्क व कोरोनाजागृती पत्रक वाटले. सूत्रसंचालन रोहिणी खाडे यांनी केले तर प्रस्ताविक भारत घोळवे यांनी केले. कार्यक्रमास ऊर्मिला घोळवे, अंगणवाडी कार्यकर्त्या अयोध्या मासाळ, नानाभाऊ शिंदे, बप्पा खाडे यांच्यासह निर्मला इंद्रायणी घोळवे, विमलबाई घोळवे, सुमन शिंदे, पुष्पा शिंदे, शोभा जाधवर आदी उपस्थित होते.
फोटो : जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटनेच्या वतीने सोनारवाडी येथे एकल महिला मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, अनुसया घोळवे, कोमल घोळवे, रोहिणी खाडे आदी.