धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार; दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 19:57 IST2021-01-29T19:55:42+5:302021-01-29T19:57:40+5:30

१४ वर्षीय मुलीच्या घराशेजारीच आरोपी तरुण वास्तव्यास आहे

Shocking! Three atrocities on a minor girl; Two accused arrested | धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार; दोन आरोपी अटकेत

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार; दोन आरोपी अटकेत

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करून नळदुर्ग पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

अणदूर येथे वास्तव्यास असलेल्या एका १४ वर्षीय मुलीच्या घराशेजारीच आरोपी तरुण वास्तव्यास होता. २७ जानेवारी रोजी दुपारी घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून शेजारच्या युवकासह अन्य दोन युवकांनी तिला आरोपीच्या घरी नेले. या ठिकाणी तिघांनी मिळून या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, मुलगी घरात नसल्याचे पाहून पीडितेच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. 

दरम्यान, २८ जानेवारीच्या पहाटे ती मुलगी अत्यवस्थ अवस्थेत घरी परतली. तिची अवस्था लक्षात घेऊन कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने नळदुर्ग ठाणे गाठून तीन युवकांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपींना शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत, तर तिसरा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Shocking! Three atrocities on a minor girl; Two accused arrested