शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाथरूड शाळेतील सहा विद्यार्थी पाॅझिटिव्ह; शाळा १४ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 17:58 IST

पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत परिसरातील खेडेगावातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात.

उस्मानाबाद/भूम -भूम तालुक्यातील पाथरूड येथील भाऊसराव काटे या शाळेतील जवळपास सहा विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी चाैदा दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत परिसरातील खेडेगावातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. पाथरूडपासून काही अंतरावर असलेल्या जयवंतनगर येथील एका नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यास अचाक ताप, सर्दीचा त्रास सुरू झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्यास पाथरूड आराेग्य केंद्रात नेऊन टेस्ट करून घेतली असता, त्यास काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले. यानंतर डाॅक्टरांनी त्याची हिस्ट्री तपासली असता, सदरील विद्यार्थी आजारी असतानाही राेज शाळेत जात असल्याचे समाेर आले. गांभीर्य लक्षात घेऊन डाॅक्टारांनीतातडीने मुख्याध्यापक नयकिडे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार नववीच्या वर्गातील सर्व ५५ विद्यार्थ्यांच काेविड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असता, मंगळवारी सर्वांची टेस्ट केली. यापैकी आणखी पाच विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाल्याचे समाेर आले. दरम्यान, आराेग्य विभागाने ही बाब सीईओ गुप्ता यांच्यासमाेर मांडताच त्यांनी शाळा चाैदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी सुनिल गायकवाड यांनी संबंधित शाळेला तसे आदेश काढले आहेत.

आणखी सहा जणांची स्वॅब तपासणी...आराेग्य विभागाकडून करण्यात आलेल्या चाचणीत पाचजण पाॅझिटिव्ह निघाले. तसेच आणखी सहाजण संशयित आहेत. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.

लक्षणे दिसताच तपासणी करा...शाळेतील विद्यार्थ्यांत थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी विद्यार्थ्यांनी आजार अंगावर काढून नये. पालकांनी पाथरूड आराेग्य केंद्रात येऊन आपल्या पाल्याची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अमाेल शिनगारे यांनी केले आहे. विध्यार्थी यांना केले आहे.

शाळा १४ दिवस बंद पाथरूड येथील शाळेत सहा विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाली आहे. नववीच्या वर्गातील सर्वांची काेविड टेस्ट करून घेण्यात आली आहे. संभाव्य धाेका लक्षात घेता, शाळा चाैदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी