शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवसेनेत जल्लोष! लोहारा नगराध्यक्षपदासाठी वैशाली खराडेंचा एकमेव अर्ज;कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 15:59 IST

कॉग्रेसचे प्रशांत काळे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

लोहारा (उस्मानाबाद ): लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीकडून शिवसेनेच्या वैशाली अभिमान खराडे तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, कॉग्रेसचे प्रशांत काळे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेनेच्या वैशाली खराडे या बिनविरोध नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. निवडीची अधिकृत्त घोषणा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी होईल.

लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केल्यानंतर मंगळवारपासून नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून तब्बल ११ जागावर विजय मिळविला आहे. यात शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. यात दोन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने आघाडीचाच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट होते. 

दरम्यान, मंगळवारी शिवसेनेच्या वैशाली अभिमान खराडे यांनीअर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांनी ही अर्ज दाखल केला. दोघांचेही अर्ज वैध ठरले. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार का ? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आज प्रशांत काळे यांनी पक्ष आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या वैशाली खराडे या बिनविरोध नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत्त घोषणा सोमवारी विशेष सभेमध्ये होईल. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोडगे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाOsmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस