शिवसेना महिला आघाडीचा मोर्चा
By Admin | Updated: October 1, 2016 01:11 IST2016-10-01T00:52:46+5:302016-10-01T01:11:52+5:30
उस्मानाबाद : दलित, बिगरशेती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शिधापत्रिका व धान्य द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

शिवसेना महिला आघाडीचा मोर्चा
उस्मानाबाद : दलित, बिगरशेती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शिधापत्रिका व धान्य द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
दलित, बिगरशेती दारिद्र्य रेषेखालील अनेक कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत. त्यामुळे संबंधित कुटुंबांना धान्य मिळत नाही. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. शहरातील भोसले हायस्कूलपासून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे दुपारी साधारणपणे १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘सातबारा नसलेल्या कुटुंबांना रेशन मिळालेच पाहिजे, सर्व गावांमध्ये दारूबंदी झालीच पाहिजे’ आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुषमा देशमुख म्हणाल्या की, ज्यांच्याकडे शेती नाही अशा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना धान्य मिळत नाही. एवढेच नाही, तर त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचाही लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना दहा ते बारा रूपये टक्के व्याजाने पैसे काढून खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली.
मोर्चामध्ये नगरसेविका प्रेमा सुधीर पाटील, शोभा तोवर, सरपंच स्वाती देशमुख, बशी शेख, शशिकला धावारे, बायमा धावारे, शेसा पांडा धावारे, मंगल सगर, जयश्री देशमुख, लक्ष्मी देशमख, विद्या देशमुख, ताई बिभीषण सोनवणे, रिजवान शेख, दिपाली संजय निंबाळकर, सुरेखा उबाळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)