संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST2021-02-21T05:01:31+5:302021-02-21T05:01:31+5:30
नंदुराम आश्रम शाळा बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदुराम प्राथमिक व सखुबाई माध्यमिक आश्रमशाळेत श्री छत्रपती मुख्याध्यापक तात्याराव ...

संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरात शिवजयंती साजरी
नंदुराम आश्रम शाळा
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदुराम प्राथमिक व सखुबाई माध्यमिक आश्रमशाळेत श्री छत्रपती मुख्याध्यापक तात्याराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक मोहन राठोड, राणाप्रताप जाधव, भारत कांबळे, हरी लवटे, उद्धव वाकडे, हणमंत सुरवसे, उद्धव कांबळे, बालाजी शिंदे, रोहिदास जाधव, अनिल चव्हाण, महादेव पुजारी, संतोष राठोड, राजेंद्र सोलनकर, शिवराज कांबळे, जनाबाई चव्हाण, रुक्मिणी कोळी आदी उपस्थित होते.
शरणाप्पा मलंग विद्यालय
उमरगा : उमरगा येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयात मुख्याध्यापक अजित गोबारे व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे उपमुख्याध्यापक सुभाष कलापे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमासाठी राजकुमार जाधव, बालाजी हिप्परगे, अगतराव मुळे, विवेकानंद पाचंगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, दुषंत कांबळे व कुमार स्वामी आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी तर आभार सतीश कटके यांनी मानले.
नृत्य परिषद
उस्मानाबाद : येथील नृत्य परिषद शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, संयोजन समिती प्रमुख धनश्री कोळपे, अदिती कुलकर्णी, अक्षता किरकसे, जिल्हा पालक शेषनाथ वाघ, जिल्हा सहसचिव शीतल देशमुख, सदस्य महेश पाटील, श्रद्धा बंडगर, उपासना पाटील, जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल देशमुख यांनी केले.
जवळका येथे व्याख्यान, मिरवणूक
वाशी : तालुक्यातील जवळका येथे महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभाचे लोकार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. शिवजयंतीदिनी अवकाळी पाऊस असल्याने दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी रोजी वारकरी मंडळीच्या सहकार्याने टाळ, मृदुंगाच्या गजरात छत्रपती शिवरायांची मूर्ती हातात घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढून महिलांनी महाराजांच्या मूर्तीचे औक्षण केले.
वाघोलीत प्रतिमा पूजन
वाघोली : उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे शिवरायांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा सरपंच संजय खडके, उपसरपंच नितीन चव्हाण, मुकुंद पाटील, राहुल सुलाखे, सुनील मगर, सुनील सुतार, गुंडाप्पा साखरे, उमेश उंबरे, साहेबराव पाटील, गुणवंत पाटील, ग्रामविकास अधिकारी माने व शिवभक्त उपस्थित होते.
गडकिल्ले छायाचित्रांचे प्रदर्शन
(फोटो : समीर सुतके)
उमरगा : शहरातील आदर्श एकता संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दोन दिवसीय दुर्गजागर (गडकिल्ल्याचे छायाचित्र प्रदर्शन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, सुधीर माने, नगरसेवक विक्रम बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुशील दळगडे, किशोर कांबळे, महावीर कोराळे, मंडळाचे अध्यक्ष आकाश चव्हाण, प्रशांत गुरव, प्रशांत जवळगेकर, महेश कांबळे, सचिन जमादार, गौरव हिरमुखे आदी उपस्थित होते.
घारगाव ग्रामपंचायतीत जयंती साजरी
घारगाव : कळंब तालुक्यातील घारगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच काकासाहेब लोमटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी. ससाणे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अरुण कांबळे, अशोक साळुंके, ग्रा.पं. सदस्य हिंमत साळुंके, धर्मराज साळुंके, हनुमंत घाटुळे, अभय कुंभकर्ण, पोलीस पाटील विनायक साळुंके, प्रवीण साळुंके, उद्धव साळुंके, रवींद्र तापडे, प्रकाश कुंभकर्ण, ज्योतिराम साळुंके आदींची उपस्थिती होती. यानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
शिवधर्म पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
मंगरुळ : कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे मुख्य चाैकामध्ये गावच्या प्रथम नागरिक केवळबाई शिंदे व शिराढोण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पंचमुखी हनुमान मंडपाच्या सभामंडपात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोफत नेत्र तपासणी करून ‘शिवाजी कोण होता’ या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय स्टेट बॅंकेचे शाखाधिकारी गजानन पोपळे, ॲड. घनश्याम रितापुरे, भागचंद बागरेचा, राम माळी, पुरुषोत्तम रितापुरे, अभिजित झाडके, दादा शिंदे आदी शिवप्रेमी उपस्थित होते. येथील भीमनगरमध्येही शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवधर्म पद्धतीने जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजरोद्दीन शेख व अमोल शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व संत रयदास यांच्याही प्रतिमेची यावेळी पूजा करण्यात आली. याप्रसंगी बालाजी माळी, नितीन गायकवाड, बिभीषण गायकवाड, आनंद झाडके, हुसेन पठाण, नितीन भराडे, राहुल रितापुरे, श्रीराम कापसे, अक्षय कापसे, भाकचंद बागरेचा, ॲड. घनशाम रितापुरे, शहाजी कांबळे, धनंजय इंगळे, गणेश शिंदे, राहुल आवाड, पुरुषोत्तम रितापुरे, दादा शिंदे, अरुण काळे आदींची उपस्थिती होती.
मराठा सेवा संघ
परंडा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पार पडला. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, नगराध्यक्ष जाकीर साैदागर, पोनि सुनील गिड्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुभाषसिंह सद्दीवाल, संजय बनसोडे, भाऊसाहेब खरसडे, राहुल जगताप, ॲड. संदीप पाटील, मेघराज पाटील, देवानंद टकले, गोरख मोरजकर, ॲड. सुभाष मोरे, ॲड. सुभाष वेताळ, ॲड. जहीर चाैधरी, ॲड. हनुमंत वाघमोडे, रत्नकांत शिंदे, शशिकांत जाधव, गोविंद जाधव उपस्थित होते.
फक्त फोटो :
भूम तालुक्यातील पखरूड ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच दादाराव चव्हाण, शरद चव्हाण, रोहिदास चव्हाण, बाबूराव चव्हाण, विष्णू चव्हाण, रामप्रसाद चव्हाण, रामचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.