शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात बंदीविरोधात शिवसेनेचा ‘जागरण गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 17:54 IST

कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

काक्रंबा : कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार नाही. त्यामुळे काक्रंबा येथील बस थांब्यावर आंदोलन करण्यात आले.  यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी म्हणाले की, केंद्र सरकारने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या गाड्या उस्मानाबाद जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही. याप्रसंगी तालुका उपप्रमुख रोहीत चव्हाण, चेतन बंडगर, उमेश खांडेकर,  शाम माळी आदींनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणे करून निर्यात बंदी उठेपर्यंत शिवसेनेतर्फे लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनात तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, काक्रंबा गण प्रमुख कालिदास सुरवसे, बालाजी बंडगर, भारत पाटील,  शहाजी ननवरे, शंकर गव्हाणे यांच्यासह अनेकजण  सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या फोटोला कांद्यांच्या माळा घातल्या. तसेच संबळ वाजून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  आंदोलनास काक्रंबा येथील भीम अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने लेखी पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भिसे, अशोक जाधव, किशोर साठे, दत्ता भिसे, युवराज भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुळजापूर मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी तसेच तलाठी बाळासाहेब पवार यांनी निवेदन स्विकारले.

टॅग्स :agitationआंदोलनShiv Senaशिवसेनाonionकांदा