दहिफळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:43+5:302021-02-10T04:32:43+5:30
मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवले असून, सोमवारी सरपंचपदी चरणेश्वर पाटील तर उपसरपंचपदी अभिनंदन ...

दहिफळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व
मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवले असून, सोमवारी सरपंचपदी चरणेश्वर पाटील तर उपसरपंचपदी अभिनंदन मते यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. सरपंच पदासाठी चरणेश्वर पाटील व प्रदीप भातलवंडे तर उपसरपंच पदासाठी अभिनंदन मते व अर्चना कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. यात पाटील व मते विजयी झाले. ही प्रक्रिया अध्याशी अधिकारी बी. व्ही. सावंत, ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
गोसावी, पाटील यांची वर्णी
(फोटो : बालाजी बिराजदार ०९)
लोहारा : तालुक्यातील भोसगा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शशिकला गोसावी तर उपसरपंच संजय पाटील यांची बिनवरोध निवड झाली. भोसगा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून आर. आर. संगमकर उपस्थित होते. त्यांना ग्रामसेवक संजय कारभारी यांनी सहाय्य केले. यावेळी व्यंकट कागे, सुभाष बिराजदार, अनिल आडे, राम पारदे, शेषाबाई एकुंडे, सुलताना शहा, मिलिंद सोनकांबळे हे सदस्य उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील ज्योती हत्तरगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मनाळे, माणिक बिराजदार, भरत नायकोडे, बालाजी एकुंडे, जिलानी शाहा, प्रसन्ना एकुंडे, राजेंद्र मनाळे, शिवशंकर हत्तरगे, सिद्धू बिराजदार, दादासाहेब वडगावे, खंडू थाटे, यल्लालिंग एकुंडे, काशिनाथ मानाळे, रेवणसिद्ध काटगावे आदी उपस्थित होते.