जवळा ग्रामपंचायतीची सूत्रे शिवसेनेच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST2021-02-13T04:31:21+5:302021-02-13T04:31:21+5:30

जवळा (नि.) - परांडा तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या जवळा (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या शीतल वाघमारे यांची वर्णी लागली. तर ...

Shiv Sena is in charge of the nearby Gram Panchayat | जवळा ग्रामपंचायतीची सूत्रे शिवसेनेच्या हाती

जवळा ग्रामपंचायतीची सूत्रे शिवसेनेच्या हाती

जवळा (नि.) - परांडा तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या जवळा (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या शीतल वाघमारे यांची वर्णी लागली. तर उपसरपंच म्हणून काम करण्याची रमेश कारकर यांना संधी मिळाली आहे.

शिवसेना पुरस्कृत भैरवनाथ विकास आघाडीतून सरपंचपदासाठी शीतल वाघमारे तर उपसरपंचपदासाठी रमेश कारकर व हनुमंत सांगडे यांनी अर्ज भरले होते. तसेच राष्ट्रवादीकडून सरपंचपदासाठी सारिका राऊत तर उपसरपंचपदासाठी शिवसेनेचेच हनुमंत सांगडे यांना सहमती दिली. प्रत्यक्ष मतदान झाले असता शिवसेनेच्या शीतल वाघमारे यांना सात तर राष्ट्रवादीच्या सारिका राऊत यांना सहा मते मिळाली. वाघमारे यांची सरपंचपदी वर्णी लागली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेचे रमेश कारकर यांना सात तर शिवसेनेचेच हनुमंत सांगडे यांना सहा मते मिळाली. उपसरपंच म्हणून काम करण्याची रमेश कारकर यांना संधी प्राप्त झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. यानंतर नूतन सरपंच, उपसरपंच तसचे सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परशु गवारे, शंकर गवारे, अशोक गवारे, हिरालाल रोडे, गहिनीनाथ वाघमारे, बिभीषण सोनवणे, जहुरोदीन मुजावर, तानाजी वाघमारे, बळी वाघमारे, शिवाजी सांगडे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Shiv Sena is in charge of the nearby Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.