शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

संभ्रवस्था संपवत शिवसैनिक सक्रीय; ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोहाऱ्यात निष्ठावान एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:27 IST

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभ्रवस्था दूर करत शिवसैनिकांनी आज लोहारा शहरात एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

लोहारा (जि.उस्मानाबाद) :शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिक संभ्रमावस्थेत होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभ्रवस्था दूर करत शिवसैनिकांनी आज लोहारा शहरात एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत, फटाके फोडून शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखून दिल्याचे चित्र पहायवयास मिळाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत बंड करून भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवले. शिंदेंच्या बंडात लोहारा-उमरगा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले सामील आहेत. मात्र, आ. चौगुले यांचे राजकीय गुरु माजी खा.रविंद्र गायकवाड यांनी मात्र आपली निष्ठा शिवसेनेशी व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ही आ. चौगुले यांच्या बंडखोरीस एकदोन अपवाद वगळता फारसा विरोध झाला नाही. तसेच त्यांच्या बंडखोरीचे समर्थन ही कोणी केले नाही. यामुळे लोहारा शहरासह तालुक्यातील शिवसैनिकांत संभ्रमावस्था होती. 

दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही संभ्रवस्था दूर झाली. माजी खा.रविंद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड यांच्यातर्फे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. तसेच शहरातील ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले शिवसैनिक खुलेपणाने पुढे आले. शहरप्रमुख सलिम शेख व शिवसैनिकांनी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, लोहारा शहरप्रमुख सलिम शेख, पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी उपनगरध्यक्ष प्रताप घोडके, पंडीत बारगळ, प्रताप लोभे, शाम नारायणकर, महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, महेबुब फकीर, परवेज तांबोळी, राजू रवळे, भरत सुतार, दत्ता पाटील, धर्मवीर जाधव, प्रेम लांडगे, बळी कांबळे, अजिम हेड्डे, पिंटू गोरे, कुलदिप गोरे, कुंडलीक मोरे, अतिक पठाण, बालाजी माशाळकर, महेश बिराजदार, शिवा सुतार, योगेश गोरे, चेतन गोरे यांच्या आदी शहरासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. 

सोशल मीडियातही शिवसैनिक झाले सक्रीय

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या बंडानंतर सोशल मिडीयापासून चार हात दुर असलेले शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सक्रीय झाले आहेत. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी आतिषबाजी करत उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे