शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवमध्ये २०० हेक्टरवर बियाणे उगवलेच नाही; शेतकरी घेणार ग्राहक मंचात धाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:15 IST

महाबीजच्या १२१ तर अन्य ३७ तक्रारी, दुबार पेरणीसाठी कंपनीकडून बियाणे मिळेना

धाराशिव : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरूनही दुबार पेरणीचा फटका बसला आहे. निकृष्ट बियाणांमुळे उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाकडे १० जुलैपर्यंत १५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी धडकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १२१ तक्रारी महाबीज या सरकारी कंपनीच्या बियाणांबाबत आहेत तर उर्वरित ३७ तक्रारी अन्य खासगी कंपन्यांविरोधात आहेत.

खरीप पेरणी करताना बहुतांश शेतकरी नामांकित सरकारी कंपनीच्या महाबीज बियाणाची मागणी करतात; मात्र यंदा नामांकित सरकारी कंपनीच्या बियाणांनीच शेतकऱ्यांना दगा दिला आहे. पेरणी केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार देण्यास सुरूवात केली. १० जुलैपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील १५८ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. तक्रारीनंतर उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी संबंधित कंपनीने बियाणे देण्याची गरज आहे; मात्र संबंधित कंपनीने बोटावर मोजण्याएवढ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे दिली. बहुसंख्य शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. कंपन्यांकडून बियाणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त व्यक्त होत असून आता न्यायासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

२२ शेतकऱ्यांनाच दिले बियाणे...धाराशिव जिल्ह्यातील कमी अधिक क्षेत्रावरील हजारो शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही; मात्र यापैकी १५८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून मोफत बियाणे दिले आहे. उर्वरित १३६ तक्रारदार शेतकरी व तक्रार न दिलेले शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. हजारो हेक्टरवरील बियाणांसह खत, मशागत वाया गेली आहे. दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. यातील बहुतांश शेतकरी भरपाई मिळवण्यासाठी ग्राहक मंचात धाव घेणार आहेत.

तक्रारी प्राप्त झाल्याबियाणांची उगवण न झाल्याने जिल्ह्यातील १५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुबार पेरणीसाठी संबंधित कंपनीने मोफत बियाणे देणे अपेक्षित आहे. काही शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले आहे. बियाणे व भरपाई न दिल्यास शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या आधारे ग्राहक मंचात जावे.-रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

तक्रारीचे निरसन करूतक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंचनामे करून मुख्यालयाला पाठवले आहेत. वरिष्ठ स्तरावरून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात येईल. २२ शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले आहेत. इतर शेतकऱ्यांचा वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेतला जाईल.-एन. जी. इनामदार, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, धाराशिव.

ग्राहक मंचात दाद मागणारअनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. काही शेतकऱ्यांना संबंधित कंपनीने पुन्हा बियाणे दिले आहे. ज्या कंपनीने बियाणे दिले नाही, त्या कंपनीच्या विरोधात शेतकरी ग्राहक मंचात दाद मागणार आहेत. भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करून सहकार्य करावे.-विलास नाईकनवरे, लासोना, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव