दुसर्या लाटेत पोलीसही भरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST2021-05-23T04:32:17+5:302021-05-23T04:32:17+5:30

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरो्य यंत्रणा जशी दिवसरात्र राबतेय, त्याच पद्धतीने कोविड नियमांचे पालन व्यवस्थित होण्यासाठी पोलीसही रस्त्यावर उतरुन गेली ...

In the second wave, the police also rushed | दुसर्या लाटेत पोलीसही भरडले

दुसर्या लाटेत पोलीसही भरडले

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरो्य यंत्रणा जशी दिवसरात्र राबतेय, त्याच पद्धतीने कोविड नियमांचे पालन व्यवस्थित होण्यासाठी पोलीसही रस्त्यावर उतरुन गेली वर्षभर काम करीत आहेत. या कामातून त्यांनाही संसर्गाने गाठलेच. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकारी तर १६८ कर्मचारी बाधित निघाले होते. यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दुसर्या लाटेत याहून अधिक हानी पोलीस विभागाची झाली आहे. मार्च २०२१ पासून ते आजतागायत २५ अधिकारी, १७७ कर्मचारी बाधित निघाले आहेत. तर यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच मनुष्यबळ कमी असताना त्यात संक्रमणामुळे या विभागावरील ताण अधिक वाढत आहे.

कोट...

कर्तव्यावर असताना अनेकांशी संपर्क येतो. यातून सुटका नाही. मात्र, तरीही संसर्गापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करतोय. प्रामुख्याने श्वासाशी संबंधित असणारे व्यायाम, योग करतो. घरचाच डबा घेऊन जेवण करतो. शएकवेळ उपाशी राहतो पण बाहेरचे खाणे टाळतोच. नियमांचे पालन तंतोतंत होईल, याची काळजी घेतो.

-एक कर्मचारी

नियम मोडणार्या लोकांना रोखण्यासाठी दिवसभर रस्त्यावर रहावे लागते. अनेकांशी जवळून संपर्क येतो. मात्र, मास्क व योग्य अंतर राखून कारवाई करीत असल्याने अडचण आली नाही. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा कपडे स्वत:च भिजवून स्वच्छ अंघोळ करुन घेतो. आहारातही रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्या बाबींचा समावेश आहे.

-एक कर्मचारी

शारीरिक व मानसिक आरोग्य महत्वाचे...

वेगवेगळ्या कामांमुळे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क ही कामाची अनिवार्य बाब आहे. तरीही खबरदारी घेण्यास सर्वांना सूचित केले आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याचे पालन करण्याकडे कटाक्ष असतो. अधिकारी, कर्मचार्यांचे प्राधान्याने लसीकरण करुन घेतले आहे. याशिवाय, आहार, व्यायामाविषयी नियमित मार्गदर्शन केले जाते. आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यार्या बाबींचा समावेश ठेवणे व जंक फूड टाळणे आवश्यक आहे. व्यायामात वेगाने चालणे, प्राणायाम या श्वसनाशी निगडीत बाबी कराव्यात. पुरेशी झोप महत्वाची आहे. या शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. शिवाय, मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी आपणास जो छंद असेल त्यास दिवसातील किमान १५ मिनिटे जरी दिली तरी ताण दूर होतो.

- राज तिलक रौशन, पोलीस अधीक्षक

Web Title: In the second wave, the police also rushed