पाच खडी केंद्रांना ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:47+5:302021-02-05T08:15:47+5:30

भूम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून खडी केंद्र चालविल्याबद्दल तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी तालुक्यात धडक मोहीम राबवित ...

Seal knocked on five stone centers | पाच खडी केंद्रांना ठोकले सील

पाच खडी केंद्रांना ठोकले सील

भूम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून खडी केंद्र चालविल्याबद्दल तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी तालुक्यात धडक मोहीम राबवित पाच खडी केद्रांना सील करून खडी जप्त करत केली. ही कारवाई २९ जानेवारी रोजी करण्यात आली. यामुळे खडी केंद्रचालकांचे धाबे दणालेले आहेत.

तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या उपस्थितीत नागेवाडी येथील साईराज स्टोन क्रेशर, इट येथील श्रीराम स्टोन क्रेशर, दुधोडी येथील दत्त कृपा स्टोन क्रेशर स्टोन केशर, पाडोळी येथील विठ्ठल सरू व हाडोंग्री येथील शिवखडा स्टोन क्रेशर या पाच खडी क्रेशर केंद्र सील करण्यात आले. या पथकात तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्यासह मंडळ अधिकारी एस.टी. स्वामी, तलाठी एन.के. थोरात, व्ही.आर. थोरात, धानोरे यांच्यासह महसूल कर्मचारी काळे, शिपाई, डोंबाळे, साठे सहभागी होते.

Web Title: Seal knocked on five stone centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.