शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'व्हॅनचे पंक्चर काढून येतो', सांगून चालक एटीएमची ८५ लाखांची रोकड घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:42 IST

तुळजापूरची घटना : एटीएममध्ये भरण्यासाठी नेली होती रक्कम

तुळजापूर (जि. धाराशिव) : कॅश व्हॅनचे पंक्चर काढून येतो, असे सांगून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले ८५ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध घेताना पोलिसांना शहरातच व्हॅन सापडली, मात्र त्यात कॅश नव्हती.

हिताची कॅश मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांचे दोन कॅश कस्टोडीअन, सुरक्षा रक्षक आणि चालक हे धाराशिव येथून कॅश व्हॅनद्वारे १ कोटी २२ लाख रुपये एटीएममध्ये भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी तुळजापूरकडे निघाले होते. तत्पूर्वी त्यांनी धाराशिव येथील एटीएममध्ये ३७ लाख रुपये भरले व उर्वरित ८५ लाख रुपये घेऊन तुळजापूरकडे रवाना झाले. दरम्यान, तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवर असलेल्या खासगी बँकेच्या समोर कॅश व्हॅन थांबवून दोन कॅश कस्टोडीअन व सुरक्षा रक्षक बँकेत गेले. यावेळी चालकाने बँकेत गेलेल्या कर्मचाऱ्यांना फोनवरून वाहन पंक्चर झाल्याचे सांगत ते काढून येतो, असे सांगितले. बराच वेळ झाला तरी तो येत नसल्याने फोन केला असता तोही बंद आढळून आला. यामुळे कर्मचाऱ्यांनी लागलीच तुळजापूर ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच दखल घेत शोध सुरू केला असता धाराशिव रस्त्यावर शहरातच व्हॅन आढळून आली. आत पाहिले असता त्यात एक छदामही आढळून आला नाही. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी वैभव शेरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक सचिन विलास पारसे (रा. धाराशिव) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी साडेचार वर्षांपासून कामावर...हिताची कॅश मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये आरोपी चालक सचिन विलास पारसे हा मागील साडेचार वर्षांपासून कॅश व्हॅन चालक म्हणून कार्यरत होता. या काळात त्याने कंपनीचा विश्वास संपादन केला होता. यानंतर आता थेट त्याने ८५ लाखांवरच डल्ला मारला.

तपासासाठी आठ पथके...कॅश व्हॅन चालकाने कर्मचारी बँकेत गेल्यानंतर वाहन पंक्चर झाल्याचे खोटे सांगून ते काढण्याचा बहाणा केल्याचे दिसून येत आहे. या घटनेत एकूण ८५ लाख रुपयांची चोरी झाली असून, आरोपी चालक रक्कम घेऊन पसार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास आठ पथके तयार करून तपास सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद