सावित्रीबाई फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:44 IST2021-01-08T05:44:36+5:302021-01-08T05:44:36+5:30
(फोटो - ०४) तामलवाडी : येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरतगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे, प्राचार्य सुभाष ...

सावित्रीबाई फुले जयंती साजरी
(फोटो - ०४)
तामलवाडी : येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरतगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे, प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव महादेव मसूते, महादेव माळी, शिवकुमार सीताफळे, विनोद कुंभार, बालाजी साठे उपस्थित होते. तसेच पिंपळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षिका अंजली निकते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती कदम, कलावती कदम, सुमित्रा कदम, शीतल कदम आदींची उपस्थिती होती.
(फोटो - ०४)
शेंडगे महाविद्यालय
उमरगा : येथील डॉ. के. डी. शेंडगे महाविद्यालयात डॉ. बी. बी. हजारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य एल. एम. जाधव, प्रा. जी. टी. ब्याळे, प्रा. एल. एम. कांबळे, प्रा. एन. एस. करपे, प्रा. पी. डी. कांबळे, प्रा. पी. डी. पवार, प्रा. पी. एम. राठोड, प्रा. पी. डी. सपकाळ, व्ही. बी. लोहार, प्रा. एस.एस. सुरवसे, प्रा. एम. एस. दुधभाते, पी. यू. माने आदींची उपस्थिती होती.
नालंदा बुद्धविहार
तुळजापूर : तालुक्यातील कुंभारी येथील नालंदा बुद्धविहारात पोलीस पाटील आयुष्यमान वडणे आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी वडणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनिता पटाडे, रोहिणी सुतार, सारिका दिलपाक, सुदामती दिलपाक, लक्ष्मी पारधे, रेश्मा दिलपाक आदीउपस्थित होते.
(फाटो ०४)
जिल्हा परिषद शाळा, धानुरी
धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी. एच. मिठेवाड, शालेय समिती अध्यक्ष राम पाटील, उमेश बनकर, शिक्षक मारूती ढोणे, सचिन हुडेकर आदी उपस्थित होते.
(फोटो - ०४)
जिल्हा परिषद शाळा, कुंभारी
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षिका वासंती गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमास सहशिक्षिका वासंती गायकवाड, अंगणवाडीसेविका इंगळे, नंदिनी लोहार, अनन्या लोहार, श्रद्धा धनके, शिवानी वडणे, हर्षद दिलपाक, शुभम शिंदे, अर्थव लोहार, संकेत वडणे, स्वप्निल पारधे आदींची उपस्थिती होती.
(फोटो - ०४)
मुरूम प्रशाला
मुरूम : येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेतील विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचा पेहराव परिधान करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच अंगणवाडी क्र. १ ते ७ ते मध्येही विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील सर्व सेविका, मदतनिसांनी मिळून विविध नाटिका, स्त्री जन्माचे स्वागत, सावित्री दिंडीचे आयोजन केले होते.
नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ
तुळजापूर : येथील नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका लीला पोद्दार, नागेश पोद्दार, गार्गी कावरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई सोमाजी, रूपाली घाडगे, अरुणा कावरे, स्वाती कावरे, श्रीदेवी वेपाठक, रंजना पोद्दार, शैलजा पोद्दार, उमा पोद्दार उपस्थित होते.