सव्वा लाखाचा गुटखा चौकीतच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 00:26 IST2015-05-25T00:22:42+5:302015-05-25T00:26:14+5:30
येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा प्रशासनाला पत्र दिल\

सव्वा लाखाचा गुटखा चौकीतच पडून
येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा रविवारी रात्री उशिरापर्यंतही येणेगूर दूरक्षेत्राच्या इमारतीत पडून होता़ मुरूम पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले असून, सुटीमुळे संबंधित विभागाचे अधिकारी येवू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले़
येणेगूर येथील बसस्थानकाच्या पाठीमागील भागात शनिवारी सकाळी १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा बेवारस गुटखा आढळून आला होता़ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येणेगूर चौकजवळील महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती़ त्यामुळे हा गुटखा कोणीतरी वाहनातून नेताना पोलिसांच्या भितीने फेकून दिला असल्याचा कायास पोलिसांनी बांधला आहे़ येणेगूर दूरक्षेत्राचे पोहेकॉ विजय साखरे, पोना बिभिषण बोकळे, दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील गुटख्याचे बॉक्स येणेगूर दूरक्षेत्राच्या इमारतीत नेवून ठेवले आहेत़ गुटखा आढळल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ दरम्यान, गुटखा सापडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली होती़ मात्र, रात्री उशिरापर्यंतही अधिकारी आले नव्हते़ विशेष म्हणजे पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही जावू, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते़ दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने हे अधिकारी येणेगुरात आलेले नव्हते़ तर मुरूम पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला गुटख्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी तरी हा गुटखा उचलला जाणार की नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे़ (वार्ताहर)